कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे देशातील जनता मोठय़ा आर्थिक संकटात सापडली असताना पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. जवळपास 3 लाख 50 हजार लोकांना कोविड-19ची लागण झाली होती. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. 12 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सरकार याबाबत कोणतेच गांभीर्य घेत नाही. हे संकट असताना पेट्रोलचे दर सात रुपयांनी वाढविले आहेत. तेंव्हा ते वाढविलेले दर तातडीने कमी करावे, या मागणीसाठी कम्युनिष्ट पार्टी आणि आयटकच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
जागतिक बाजारपेठेमध्ये पेट्रोलचे दर कमी आहेत. असे असताना देशात मात्र पेट्रोलचे दर दिवसागणिक वाढत चालले आहेत. गेल्या 12 दिवसांमध्ये तब्बल 7 रुपये पेट्रोलचा दर वाढविण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाईही वाढत चालली आहे. तेंव्हा त्याचे दर कमी करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. आशा कार्यकर्त्यांनी कोविड-19 काळात काम केले आहे. त्या योध्दय़ांना 3 हजार रुपये द्यावेत. अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांनाही पाच हजार रुपये द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सीआयपीचे सेपेटरी कॉ. नागेश सातेरी, आयटक आणि केएसआरटीसीचे सेपेटरी सी. एस. बिदनाळ, व्ही. व्ही. चिक्कमठ, एस. एन. बेन्नी, ऍड. सुरेश तरळे, ऍड. अजय सातेरी, एस. बी. डोंगरे, बी. व्ही. नरसण्णावर, ए. जी. गामनगट्टी, बी. जी. तायकर, बी. एफ. हडपद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..