साधना पोटे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थी दशेचा काळ हा अतिशय शांततेचा असून या काळात जी दिशा द्याल, त्याप्रमाणे जीवनाला वळण प्राप्त होते. त्यामुळे लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे गरजेचे आहेत. अभ्यासाची जोड मिळाल्याने आपले व्यक्तिमत्त्व सहज उठावदार बनेत. कोणत्याही स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जाताना अभ्यासक्रम, परिक्षेचे स्वरूप, मागील प्रश्नपत्रिका व संदर्भ ग्रंथ या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे बेंगळूर येथील औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगार खात्याच्या सहसंचालिका साधना पोटे यांनी सांगितले.
दमशि संचलित ज्योती करिअर अकॅडमीतर्फे सनदी अधिकाऱयांच्या सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साधना पोटे बोलत होत्या. व्यासपिठावर हुबळी येथील असिस्टंट कमिशनर ऑफ कमर्शियल टॅक्स ऑफिसर शाकिर अहमद तोंडीखान, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, आयएएस अधिकारी वेंकट राजू, सचिव प्रा. विक्रम पाटील, सहसचिव डॉ. दिपक देसाई, प्राचार्य डॉ. एस.एन. पाटील, ज्योतील करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. अमित सुब्रहमण्यम उपस्थित होते.
शाकिर तोंडीखान यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यास सांगितले. तर व्यंकट राजू यांनी अवांतर वाचनावर भर देण्यास सांगितले. संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रा. शुभम चव्हाण व सिमरन नदाफ यांनी परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.