प्रतिनिधी /बेळगाव
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेतर्फे मराठा मंदिर येथे भरलेल्या आविष्कार उत्सवाची यशस्वी सांगता रविवारी झाली. यावेळी उत्कृष्ट स्टॉलधारकांना बक्षिसे देण्यात आली. स्टॉलचे परीक्षण समीर तेंडोलकर यांनी केले.
या उत्सवात उत्कृष्ट स्टॉल म्हणून येबा बॅग्जच्या ऋतुषा गुलाबानी (19), इराज वॉर्डरोबच्या स्नेहा जोशी (38) व एस. पी. फुडस्च्या गीतांजली पवार (5) यांच्या स्टॉलना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची बक्षीसे देण्यात आली. लीना जठार यांनी आपल्या सासुबाई विजया जठार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिल्या क्रमांकाच्या स्टॉलसाठी बक्षीस पुरस्कृत केले आहे. संप्रित मोहता पुरस्कृत विशेष बक्षीस मॅजिकल वॉईब्जच्या (45) मनीषा रुपचंदानी यांना तर उत्कृष्ट खाद्यपदार्थाचा स्टॉल म्हणून ऍपॅटाईट ऑन प्लॅटर या स्टॉलला देण्यात आला. नेहा व अर्चना या स्वयंसेवकांनाही बक्षीसे देण्यात आली.
समीर तेंडोलकर यांनी सर्वच स्टॉलधारकांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी समीर यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन निहारीका पुसाळकर यांनी केले.