बेंगळूर : विरशैव-लिंगायत समुदायाचा मागासवर्ग यादीत समावेश करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. याच उद्देशाने शनिवारी बेंगळूरमध्ये विरशैव-लिंगायत मठाधीशांची सभा आयोजित करण्यात आली आहे. बेंगळूरच्या विजयनगर येथील श्री बसवेश्वर सुज्ञान मंटपमध्ये ही सभा होणार आहे. राष्ट्रीय विरशैव-लिंगायत मठाधीशांच्या संघटनेमार्फतही ही सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवयोग मंदिरचे अध्यक्ष होस्पेटचे जगद्गुरु, शैलपीठाचे स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे मठाधीश, उज्जैनी मठाचे स्वामीजी हे या सभेचे नेतृत्व सांभाळणार आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण यासह विविध राज्यातील विरशैव-लिंगायत मठांचे मठाधीश तसेच गुरु-विरक्त परंपरेतील सुमारे 500 हून अधिक मठाधीश यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय विरशैव-लिंगायत मठाधीशांच्या संघटनेच्या वतीने विभुतीपूर मठाचे डॉ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, सर्पभूषण मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, कंचुकल बंडे मठाचे बसवलिंग स्वामीजी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
Trending
- शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ चेतन नरके यांनी धामोड खोऱ्यात भेटीगाठी
- पाडलोसमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रचारात मुसंडी
- पाकिस्तानात बस अपघातात 20 ठार
- वडार समाजाचा नव्या सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध; खासदार धैर्यशील माने
- केसरकर आणि राणे वादामुळेच सावंतवाडीचा विकास खुंटला – रुपेश राऊळ
- इचलकरंजीकरांसाठी पिण्याचे पाणी आणले नाही, तर कोणतीही निवडणूक लढविणार नाही : खास. धैर्यशील माने
- धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांची जयसिंगपुरात रॅली
- एफआरपीसाठी कुणाला आंदोलन करण्याची गरज नाही : सदाभाऊ खोत