वृत्तसंस्था/ लंडन
रविवारी अमिरातमध्ये झालेल्या लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात वुल्व्ह्सने अर्सेनेलचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या लीग स्पर्धेतील अर्सेनलचा हा सलग तिसरा पराभव आहे.
रविवारीच्या सामन्यात खेळताना वुल्व्ह्स संघातील मेक्सिकन फुटबॉलपटू रॉल जिमेनेझ याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. जिमेनेझच्या दुखापतीनंतर वुल्व्ह्सने त्याच्या अनुपस्थितीत अर्सेनलचा पराभव केला. मैदानावर सुमारे 10 मिनिटे जिमेनेझवर प्रथमोपचार चालू होते. त्यानंतर त्याला स्ट्ऱेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. हेडिंग करताच्या प्रयत्नात जिमेनेझ आणि लुईझ यांच्यात टक्कर झाली. त्याच्या कवटीला प्रॅक्चर झाले असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या सामन्यात वुल्व्ह्सतर्फे पेड्रो नेटो आणि डॅनियल पोडेन्सि यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. 1979 नंतर वुल्व्ह्सचा अर्सेनलवर हा पहिला विजय आहे. या स्पर्धेत गुणतक्त्यात वुल्व्ह्सने सहावे स्थान मिळविले असून टोटेनहॅम पहिल्या आणि लिव्हरपूल दुसऱया स्थानावर आहे.