येणाऱ्या वाहनांना धोका
वेंगुर्ले / वार्ताहर:-
वेंगुर्ले तुळस मार्गे सावंतवाडी रस्त्यावरील तुळस घाटी उतारावर गोवर्धन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत डाव्या बाजूला साईड पट्टीवर एक मोठे भगदाड रस्त्याच्या दिशेने मध्यापर्यंत पडलेले असून ते सहा फूट खोल आहे. याबाबतची कल्पना तुळस सरपंच शंकर घारे यांना मिळताच त्यांनी त्वरित वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आवटी यांना कळवले.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेबाबत काहीच कल्पना नसून या ठिकाणी दुर्घटना घडल्याची दाट शक्यता आहे. सदर भगदाड हे रस्त्याच्या डांबरीकरणापासून आतील बाजूस ६ फूट आहे. मात्र सायंकाळपर्यत सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर उपाय योजना केलेली नव्हती.