वैयक्तिक माहिती शेअर करता येणार : ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुगल आपल्या ग्राहकांच्यासाठी नियमितपणे वेगवेगळय़ा सुविधा देण्यात अग्रेसर असल्याचा अनुभव आहे. आता गुगलने नवी योजना आणली असून आपल्या ग्राहकांना व्हर्च्युअल व्हीजिटींग कार्ड निर्मिती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. कंपनीकडून भारतीय ग्राहकांच्यासाठी विशेष ‘people cards’ सर्व्हीसचा प्रारंभ केला असल्याची माहिती देण्यात आली.
सदरच्या नवीन फिचरनुसार गुगल सर्चमध्ये ग्राहकांना व्हर्च्युअल व्हीजिटींग कार्ड तयार करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या कार्डचा वापर करुन ग्राहकांना आपली वेबसाईट, सेशल मीडीया हँडेल आणि अन्य माहिती शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.
ही सेवा गुगलच्या Knowledge Graph चा वापर करुन उपयोगात आणण्यात येऊ शकेल. मात्र यासाठी ग्राहकांना मोबाईल नंबर द्यावा लागणार असून गुगल सर्च वर ‘people cards’ कार्ड तयार करण्यासाठी संबंधीत ग्राहकांचे खाते हे असणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
मोबाईल ग्राहकांसाठी सेवा
कंपनीकडून मोबाईल ग्राहकांच्यासाठी विशेष सवलत देणार आहे, याचा अर्थ आपल्याला आपल्या पब्लिक प्रोफाईल बनविण्यासाठी आपल्या मोबाईल डीव्हाईसवर गुगल अकाउंटमध्ये लॉगीन करावे लागणार आहे. सदरची योजना ही फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.