प्रतिनिधी/ बेळगाव
उद्योग क्षेत्रात अभियांत्रिकीचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीने भारतातील नामवंत कंपन्यांशी भागीदारी करून 4 वर्षांचा बी.टेक. आणि कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड बिझनेस सिस्टीम, रोबोटिक्स ऍण्ड ऑटोमेशन व मेकॅनिकल ऍण्ड स्मार्ट मॅन्युफॅक्चEिरग हा पी. जी. डिप्लोमा अभ्यासक्रम यावर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता मिळाली असून व्हीटीयूने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), कन्सल्टींग ऍण्ड बिझनेस सोल्युशन्स ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट यांच्याशी करार केला आहे. या करारानुसार सदर कंपन्या विद्यापीठाला तज्ञ पाठवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देतील.
सदर अभ्यासक्रमाचे उद्घाटन 24 नोव्हेंबर रोजी व्हीटीयूच्या आवारात उपमुख्यमंत्री व प्र-कुलगुरु डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरु प्रा. करिसिद्धाप्पा, कुलसचिव ए. एस. देशपांडे व सतीश अण्णीगेरी, वित्त अधिकारी एम. ए. सपना आदी उपस्थित होते.