प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी 2 हजार 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून गेल्या 24 तासात दहा जण दगावले आहेत. बेळगाव तालुक्मयातील 149 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 73 हजार 135 वर पोहोचली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 2 हजार 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 65 हजार 800 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 645 वर येऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आजवरचा सरकारी आकडा 69 वर पोहोचला आहे.
चिकोडी तालुक्मयातील चार, बेळगाव, अथणी, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती व खानापूर तालुक्मयातील प्रत्येकी एक असे एकूण दहा जण दगावले आहेत. शनिवारी अथणी तालुक्मयातील रुग्णसंख्येनेही शंभरचा आकडा पार केला असून बेळगाव पाठोपाठ अथणी, चिकोडी तालुक्मयातही रुग्णसंख्या वाढत आहे.
कंग्राळी बी. के., बेळगुंदी, भेंडीगेरी, बिजगर्णी, देसूर, गणेशपूर, होनगा, सावगाव रोड, के. के. कोप्प, कलखांब, काकती, करडीगुद्दी, गोजगा, खादरवाडी, आंबेवाडी, येळ्ळूर, मोदगा, मुतगा, पिरनवाडी, सुळगा, कल्लेहोळ, बहाद्दरवाडी, कुट्टलवाडी, मारिहाळ, कडोली, सरस्वतीनगर, आदर्शनगर, आनंदवाडी शहापूर, अनगोळ, कुवेंपूनगर, मार्कंडेयनगर, टिळकवाडी, नेहरूनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
महांतेशनगर, सदाशिवनगर, सह्याद्रीनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, सुभाषनगर, आझमनगर, बसव कॉलनी, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर, गांधीनगर, गोडसेवाडी, हिंडलगा, हिंडाल्को कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी, उचगाव, वडगाव, हनुमाननगर, रुक्मिणीनगर, भारतनगर-शहापूर, राजवाडा कंपाऊंड-वडगाव, मलप्रभानगर-वडगाव, लक्ष्मी टेकडी परिसरातही रुग्ण आढळले आहेत.