कणकवली/प्रतिनिधी-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये बेपत्ता झालेल्या प्रमोद वायंगणकर यांचे बंधू शरद वायंगणकर यांची शिवसेना उपतालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खारेपाटण येथील गोट्या कोळसुलकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.
येथील शिवसेना कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय फडके यांनी श्री कोळसुलकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला आघाडीच्या नीलम सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सचिन सावंत, युवासेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक, गितेश कडू, राजू राठोड, हर्षद गावडे, प्रतिक्षा साटम, रुपेश आंमडोस्कर, रिमेश चव्हाण, मंगेश सावंत, महेंद्र डीचवलकर, दामू सावंत, शेखर राणे व इतर उपस्थित होते. वायंगणकर यांच्या भावाने गद्दारी केल्याने ही हकालपट्टी केल्याचे पडते म्हणाले.