शिराळा /वार्ताहर
येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समवेत आयोजित बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील चार डॉक्टरांच्या मदतीने गावात व शाळेत आजारी असणाऱ्या ५० वर्षा पुढील व बाहेरून आलेल्या लोकांचे स्वँब घ्या. कोकरूड ग्रामीण रुग्णालय येथे विलगीकरण कक्ष सुरू करा थर्मल गन, ग्लोज,मास्क याची माहिती घेतली.
त्यानंतर चौधरी यांनी शिराळा तालुक्यातील मणदूर, ग्रामीण रुग्णालय कोकरूड, रिळे या गावांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सुरू असणारा सर्व्हे, मुंबईहून आलेले लोक, क्वारंटाईन झालेले लोक, गावात करण्यात आलेल्या विविध उपाय योजना यांचा आढावाही घेतला. सध्या पावसाळा सुरू झाल्याने मणदूर येथील आरोग्य कर्मचारी यांच्या निवास्थानाच्या दुरुस्तीची मागणी सरपंच वसंत पाटील यांनी केली. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले. रिळे येथे उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी रिळे ग्रामस्थांनी केली. तर ठाणे,मुंबई,रायगड, पालघर आदी ठिकाणाहून येणाऱ्या पन्नास वर्षीय पेक्षा जास्त वयोमर्यादा असणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी.त्यांची दैनंदिन तपासणी करण्यात येणार आहे. कोरोणा बाबत लागणारे औषधोपचार व साहित्य त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच बरोबर प्रशासनाने मास्क वापरण्यासाठी प्रबोधन करावे.
यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, तालुका समन्वयक डॉ स्वाती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनजीत परब, डॉ.नंदकुमार गवारी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले,ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील, रिळे येथे डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव , सरपंच आशा आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ , ग्रामसेवक तेजस्विनी घोडके, तलाठी करिष्मा मुल्ला, पोलीस पाटील सुधीर पवार, उपस्थित होते.