प्रतिनिधी / बेळगाव
श्रावण महिन्यातील विविध सण आणि पूजाविधींना प्रारंभ झाला असून, त्यासाठी बाजारपेठेत फुलांची आवक वाढली आहे. गुरूवारी सकाळी गांधीनगर येथील फूलमार्केट येथे फुलांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. खरेदीसाठीची गर्दी काळजी करण्याजोगी असली तरी फूल विपेते मात्र खूष झाले.
शुक्रवारी होणाऱया लक्ष्मी पूजेसाठी बाजारपेठेत फळफळावळे, फुले यांची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेला सध्या बहर आला आहे. पांढरी व पिवळी शेवंती, डेलिया, कमळ, केवडा, गुलाब,
ऍस्टर, झेंडू या रंगीबेरंगी फुलांच्या राशी डोळय़ांना आल्हाददायक वाटत आहेत. फुलांचे वेगवेगळे माप असून त्यानुसार दर आकारले जात आहेत.
पुजेसाठी पाच फळे आवश्यक असल्याने पाच फळांचे संच 25 ते 30 रुपयांना उपलब्ध आहेत. याशिवाय विविध फळांची विक्री तेजीत झाली. बेळगावला भाजी, फुले आणि फळे यांची खरेदी अलिकडच्या काळात उत्साहाने होत आहे. कोरोनामुळे मर्यादा आल्याने सणवार करताना सुद्धा मर्यादा आल्या. यंदा मात्र कोरोना नियंत्रणात असल्याने नागरिकांनी हौसेने खरेदी
केली.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली तरी नागरिकांचा खरेदी करण्याचा उत्साह कायम होता. देवीचे आणि गौरीचे मुखवटे घेण्यासाठी सुद्धा गर्दी झाली आहे. यंदा गौरी आणि लक्ष्मीचे मुखवटे लावून देवीसाठीची खास साडी सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. महिलांनी बऱयापैकी त्यांची खरेदी केली. शुक्रवारी महिला या लक्ष्मीची विधिवत पूजा करून विशेष आरास करतील. त्यासाठी फुलांची आवश्यकता असल्याने विपेत्यांनी तो अंदाज बांधून फुलांची मागणी दुप्पट केली होती.