बेंगळूर : भाजप खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी शुक्रवारी निवडणूक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. श्रीनिवास प्रसाद यांनी शुक्रवारी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून आगामी निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. त्यांनी 2018 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. याविषयी बोलताना ते म्हणाले, चार वर्षांपूर्वीच राजकारणातून निवृत्त होणार होतो. पण राजकारणात विविध घडामोडींमुळे लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. आता निवडणूक राजकारणातून माघार घेणार असून यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही.
Previous Article6 कोटीचे मोबाईल लांबविले
Next Article बेंगळुरात 6 कोटीचे ड्रग्ज जप्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.