प्रतिनिधी / सातारा :
संभाजीनगरमधील श्रीसाई कॉलनीत राहत असलेले नवनाथ यदु केंजळे (वय 51) यांच्या घरात शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत 2 लाख 22 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नवनाथ केंजळे यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी शुक्रवारी 6.30 ते 9.20 च्या सुमारास आत प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोने- चांदीचे दागिने असा 2 लाख 22 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीची अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन.एस.कदम करत आहेत.