चोचीने डोक्यावर वार करून शोषून घेतो रक्त
ब्रिटनमध्ये सध्या समुद्रकिनारी सुरक्षारक्षक तसेच अन्य लोक सागरी पक्षी सीगलमुळे अत्यंत घाबरलेले आहेत. सीगल सध्या लोकांवर हल्ले करत आहेत. यामुळे लोकांना वाचण्यासाठी मजबूत हेल्मेट घालावे लागत आहे. याचबरोबर कधी झाड तर भिंतीमागे लपून रहावे लागत आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/07/SEAGULL.jpg)
ब्रिटनमध्ये सीगलने धडकीच भरविली आहे. माणूस आपल्याला नुकसान पोहोचवेल असे वाटत असल्यानेच कदाचित सीगल हल्ले करत आहेत. समुद्रकिनाऱयावर तैनात सुरक्षारक्षक छत्र्यांखाली लपून राहतात, जेणेकरून संतप्त सीगल पक्ष्यांपासून वाचता येईल. स्थिती अत्यंत भयानक झाल्याने रॉयल मेल या पोस्टल सेवेने टपाल पोहोचण्यास विलंब होऊ शकतो असे नागरिकांना कळविले आहे.
समुद्रकिनाऱयाला लागून असलेल्या भागांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना रॉयल मेलने पत्र लिहिले आहे. डिलिव्हरी स्टाफवर सीगल पक्ष्यांकडून हल्ले होत असल्याने टपाल पोहोचविण्यास विलंब होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सीगल पक्षी डोक्यावर चोच मारून निश्चितपणे रक्त शोषून घेऊ शकतो असे 74 वर्षीय स्थानिक रहिवासी निकोलस स्किनर यांनी म्हटले आहे.