प्रतिनिधी / वास्को
डय़ुटीवर व्यस्त असताना वास्कोतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश नाईक यांना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.
सुरेश नाईक(54) हे सध्या गोवा पोलीस खात्याच्या सागरी पोलीस विभागाच्या सेवेत होते. हार्बर मुरगाव येथील कार्यालयात काम करीत असताना बुधवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने ते खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱयांनी त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी हलवले असता वाटेतच त्यांना मृत्यू आला. मयत सुरेश नाईक हे बोगदा भागात राहात होते.