पुलाची शिरोली / वार्ताहर
अवजड वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सांगली फाटा येथील उड्डाणपूलावर घडला. किरण गबरु पाटील वय वर्षे ४९, रा. शिये ता. करवीर असे त्याचे नाव आहे.
किरण पाटील याच्या स्वमालकीचा ट्रॅक्टर आहे. तो बुधवारी सकाळी शियेकडून गोकुळ शिरगाव येथे भाडे घेऊन जात होता. सांगली फाटा येथील उड्डाणपुलावरती आला असता पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाने ट्रॅक्टर-ट्रॉलीस दाबले. यामध्ये ट्रॅक्टर डिवायडरवर अडकला व ट्रॉली पल्टी झाली. यात किरण हा गंभीर जखमी झाला होता. त्यास कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.