प्रतिनिधी / सांगे
येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत सांगे मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला चांगला प्रतिसाद लाभणार असल्याचे चित्र आहे मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तरीही तृणमूलने कोपरा बैठकांचा सपाटा लावला आहे. राखी प्रभुदेसाई नाईक ह्या सध्या सांगे मतदारसंघात सक्रिय झाल्या असून घरो घरी भेटी देत आहेत.
पक्षाच्या नेत्या व राज्यसभा खासदार सुश्मिता देव यांनी सांगे मतदातसंघाचा दौरा करत ठीक ठिकाणी कोपरा बैठका घेऊन मतदारांना तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सांगे मतदार संघातील नेत्रावली येथे तृणमुळच्या कोपरा बैठकीत लाभलेला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सोबत राखी प्रभुदेसाई नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.