नियम मोडेल त्याच्यावर होणार कारवाई
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियम काढले जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही नव्याने नियमावली लागू करण्यात आलेले आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गौडा यांनी आज खाते प्रमुखांना दिलेले आहेत तसेच जिल्ह्यातील पंचायत समिती नाही आदेश दिले गेले आहेत.
सातारा जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमावली बनवली जात आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा नव्याने नियमावली तयार करण्यात आलेले आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काम करताना नेमक्या काय काळजी घ्यावी याबाबत या आदेशात म्हटले गेले आहे ते पुढीलप्रमाणे अधिकारी-कर्मचारी यांनी शंभर टक्के उपस्थिती ठेवताना सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. कार्यालयात काम करताना तोंडावर नाकावर मास्क असणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेत प्रवेश करताना सॅनिटायझर ने हात स्वच्छ करून व प्रत्येकाचे तापमान मोजून प्रवेश करावा सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी आणि गर्दी टाळून आपले कामकाज करावे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बाहेर चहापानासाठी जाऊ नये, कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या या शासकीय नियमाच्या अधीन राहून आपल्या कार्यालयात पार पाडाव्यात केबिन बाहेर जाणे टाळावे, सर्व परिपत्रके अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी जे कर्मचारी नियम पाहणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.