सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावानंतर माण तालुक्यातील गंभीर घटना
म्हसवड : माण तालुक्यातील पानवन येथे अज्ञातांनी एका डॉक्टरचे अपहरण करून त्याच्या गाडीची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ता. माण) असे अपहरण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर डॉ. शिंदे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञातांनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्या गाडीची जाळपोळ केली. ठरावानंतर ही घटना घडल्यामुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. म्हसवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.