प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील यादोगोपाळ पेठ रमाकांत टॉवर ऋषिकेश दत्तात्रय गहिने वय, 22 याने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दार उघडत नसल्याने आईने इतरांना कळवले. आज दार फोडल्याने त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समजले. शाहूपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.