प्रतिनिधी / सातारा :
संगम माहुली येथे रेल्वे स्टेशननजीक माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेने शनिवारी दोन म्हैशींना जोरदार धडक दिली. त्यामुळे एका म्हैशीचा मृत्यू झाला, तर दुसरी म्हैस गंभीर जखमी आहे. संबंधित रेल्वे पुण्याच्या दिशेने कोल्हापूरच्या दिशेकडे जात असताना हा अपघात घडला. प्रसंगी रेल्वेच्या चाकामध्ये म्हैशी अडकल्याने रेल्वे जागीच उभी राहिली.
अखेरीस जेसीबीच्या सहाय्याने म्हैस बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच अपघातत मृत जनावरांची झालेली अवस्था पाहुन सर्वांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. याप्रसंगी रेल्वे विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग ही उपस्थित होते.