राजू गडकरी अष्टपैलू खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नवज्योत खो-खो संघटना सुळगा, हिंडलगा व साधना क्रीडा केंद्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कडोली संघाने तुरमुरी संघाचा पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले. बेस्ट चेजर कुमार पाटील येळ्ळूर, बेस्ट रनर सुशांत कुटे, तर अष्टपैलू खेळाडू राजू गडकरी यांना गौरविण्यात आले.
सुळगा येथील प्राथमिक मराठी शाळा येथे रविवारी घेण्यात आलेल्या एक गाव एक संघ अशा खो-खो स्पर्धेत येळ्ळूर, गर्लगुंजी, तुरमुरी, सुळगा, हिंडलगा, कडोली, याशिवाय इतर संघानी भाग घेतला होता. अंतिम सामना छत्रपती युवा क्रीडा केंद्र कडोली व तुरमुरी या संघांत झाला. या सामन्यात छत्रपती युवा क्रीडा केंद्राच्या संघाने तुरमुरीचा 1 डाव 3 गडय़ानी पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे साधना क्रीडा केंद्राचे माजी खो-खोपटू व बुडा चेअरमन संजय बेळगावकर, अ. भा. खो-खो संघटनेचे माजी सचिव व लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीकांत मोरे, ग्रा. पं. सदस्य बाळू पाटील, भागण्णा नरोटी, मारूती पाटील, सागर सांगावकर, महादेव कंग्राळकर, मल्लाप्पा सुळगेकर, गणपती गडकरी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या छत्रपती युवा केंद्र कडोली संघाला कै. विमन कोरे स्मरणार्थ 10000 रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या तुरमुरी संघाला मार्कंडेय सोसायटी पुरस्कृत 7000 रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चेजर यश पाटील येळ्ळूर, उत्कृष्ट रनर सुशांत कुट्रे कडोली, अष्टपैलू खेळाडू राजू गडकरी तुरमुरी यांना रोख 1 हजार रूपये, आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ट खो खो प्रशिक्षक प्रकाश देसाई, प्रकाश नंदीहळ्ळी, सतिश बाचीकर, अजित भोसले, अशोक हलगेकर, उमेश पाटील, पी. ओ धामणेकर, परशराम येळ्ळूरकर, परशराम कांबळे, वैजनाथ चौगुले, शांताराम कडोलकर, राजू मुचंडी, विवेक पाटील, शिवानंद कोरे आदी साधना क्लबच्या पदाधिकाऱयांनी व नवज्योत क्रीडा संघटना सुळगा संघटनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले. पंच म्हणून महेश सिद्दानी, नितीन नाईक यांनी काम पाहिले.