सावंतवाडी प्रतिनिधी:
सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी कवठेमहाकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सर्जेराव कणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची ओरस येथील एम आर जी एस च्या गटविकास अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पद गेले दीड वर्ष रिक्त होते त्यानंतर या पदावर परब सहाय्यक गटविकास अधिकारी श्री नाईक यांना प्रभारी गटविकास अधिकारी देण्यात आला होता. त्यांनी गेल्या दीड वर्षात करुणा महामारी च्या काळात तालुक्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट काम केले आहे त्यांची आता येथे पदोन्नतीवर गटविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे सावंतवाडी गटाविषयी अधिकारी कवठे महारश्री कणसे यांची बदली करण्यात आली आहे येत्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत मात्र सावंतवाडी पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पद रिक्तच राहणार आहे