प्रतिनिधी /वास्को
भारतीय नौदलातर्फे कारवार ते नवी दिल्लीपर्यंत मोटरसायकल प्रवास मोहिम हाती घेण्यात आली आहे. स्वर्णीम विजय अभियान अशा शिर्षकाखाली स्वर्णीय विजय वर्ष व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ही मोहिम असून योगायोगाने याच क्षणी नौदलाला प्रेसिडेन्ट कलर सन्मान प्राप्त झालेला आहे. सोमवारी कारवार येथील सी बर्ड तळावरून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. येत्या दि. 3 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम चालणार आहे.
50 पेक्षा जास्त नौदल कर्मचारी अकरा मोटरसायकल व दोन सपोर्ट वाहनांसह या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ही मोहिम कारवार ते नवी-दिल्लीपर्यंत 6,000 किलो मीटर अंतर पार करेल.
या मोटरसायकल मोहिमेतील मोटरसायकल राईडर्स नॅशनल डिफेन्स अकादमी, सातारा येथील सैनिक स्कुल, बालाचडी, कापुरथाला व कुंजपुरा व राष्ट्रीय मिलिटरी स्कुल, चैल येथील कॅडेटस व कर्मचाऱयांशी संवाद साधतील. तसेच लोणावळा येथील नौदल विभाग, पोरबंदर व जामनगर येथील भारतीय लष्कर व इंडियन एअर फोर्सच्या आस्थापनाना भेटी देतील.
काल सोमवारी कारवारच्या नौदल जहाज दुरूस्ती यार्डचे रिअर ऍडमिरल डी. के. गोस्वामी यांनी आयएनएस विक्रमादित्य येथून या मोहिमेला बावटा दाखविला.