आमच्या समाजात चांगल्या माणसांचा शिक्का ज्या गोष्टींमुळे बसतो, त्यात दररोज आंघोळ करणे ही मोठी अट आहे. दररोज आंघोळ न करणाऱया व्यक्तीला अस्वच्छ मानले जाते. पण आता एका सुपरस्टारने दररोज आंघोळ करणे योग्य वाटत नसल्याचे म्हटले आहे. हॉलिवूड अभिनेता जेक गिलेनहालला आंघोळ आवश्यक असल्याचे वाटत नाही.
आंघोळ करणे कमी आवश्यक असल्याचे मला वाटते. अभिनेत्री मिला कुनीस आणि एश्टन कूचरकडून स्वच्छतेविषयी चर्चा सुरू करण्यात आल्यावर 40 वर्षीय जेक गिलेनहालने ही टिप्पणी केली आहे. जोपर्यंत आमच्या मुलांना आम्ही अस्वच्छ बघत नाही तोवर त्यांना आंघोळ घालत नसल्याने मिला आणि एश्टन या दांपत्याने म्हटले होते.