नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशिलकुमार याला छत्रसाल स्टेडियम हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आता त्याला रेल्वेच्या नोकरीतूनही निलंबित करण्यात आले आहे. तो सध्या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. सागर राणा या 23 वर्षांच्या मल्लाची हत्या करण्यात त्याचा हात होता, असा आरोप करण्यात आला आहे. त्याच्यासह त्याच्या अजयकुमार नामक सहकाऱयालाही अटक करण्यात आली आहे.