प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणातील प्रमुख दलालाने मंगळूर येथील तिलक पुजारी यांच्याकडून मांडवलीसाठी घेतलेले पैसे परत केले आहेत. यासंबंधीची माहिती हाती आली असून कारमधील सोने चोरल्यानंतर आपण साळसूद आहे हे सराफाला दाखविण्यासाठी त्याचे पैसे परत करण्यात आले आहेत. सीआयडीच्या अधिकाऱयांनी या संबंधीची माहिती जमविली असून अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
वरि÷ अधिकाऱयांचा दलाल किरण वीरनगौडर हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सामोरे आले असून यमकनमर्डी पोलीस स्थानकात उभी करण्यात आलेली कार सोडविण्यासाठी या महाभागाने 60 लाख रुपयांची मागणी केली होती. 25 लाख रुपयांना सौदा ठरविण्यात आला होता. संकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये 15 लाख व धारवाड येथील कॉपी-डे जवळ 10 लाख रुपये देऊन आमची गाडी सोडवून द्या, अशी विनंती सराफाने केली होती.
केवळ यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून न्यायालयाला याची माहिती दिल्यामुळे सहजपणे कार सोडविता आली नाही. स्वतः वरिष्ट अधिकारीच या प्रकरणात सहभागी असले तरी सहजपणे कार बाहेर काढता आली नाही. कार सोडविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच किरणने कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोने पळविले.
अडीच कोटी रुपयांना सोन्याची विक्री
सोने हातात आल्यानंतर वरिष्ट पोलीस अधिकारी व दलालांची भूमिकाच बदलली. हुबळी येथील एका सराफाकडे त्या सोन्याची विक्री करण्यात आली असून तो सराफ मूळचा सांगली येथील राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे. अडीच कोटी रुपयांना सोन्याची विक्री केल्यानंतर आपण किती साळसूद आहे, कार सोडविण्यासाठी कसे प्रामाणिकपणे प्रयत्न केले, हे दाखवून देण्यासाठी संबंधितांना 25 लाख रुपये परत करण्यात आले आहेत.
तिलक पुजारीच्या जबानीत धक्कादायक माहिती
पैसे घेतल्यानंतर कार सोडविता आली नाही म्हणून या दलालाने घेतलेले पैसे परत केले आहेत. यावरून ही माणसे किती चांगली आहेत? अशी भावना मंगळूर येथील सराफ व त्यांच्या सहकाऱयांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र हे प्रकरण सीआयडीकडे गेल्यानंतर त्यांचा खरा चेहरा उघड झाला. यासंबंधी सीआयडीच्या अधिकाऱयांनी तिलक पुजारी याची जबानी घेतली असून जबानीत धक्कादायक माहितीचा उलगडा झाला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे 9 जानेवारीनंतर किरण वीरनगौडरने अनेकवेळा बेळगाव, यमकनमर्डीत येवून या प्रकरणात मांडवली केली आहे. संकेश्वर येथील एका लॉजमध्ये मंगळूरच्या सराफांबरोबर जेवण घेताना पोलीस अधिकारीही तेथे उपस्थित होते. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार हेही त्या लॉजमध्ये आले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. यासंबंधीचे सीसीटीव्हीचे फुटेज तपास अधिकाऱयांच्या हाती लागले आहेत.
टोल पार करताना सांगतो पोलीस म्हणून…
या प्रकरणाच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली. तपास अधिकाऱयांनी टोलनाक्मयावरील सीसीटीव्हीचे फुटेज व इतर माहिती जमविली असून केए 25 एमए 0966 क्रमांकाच्या कारमधून बेळगावला येताना या महाभागाने पोलीस अधिकारी असल्याचे टोलगेटवर सांगितले आहे. टोलगेटवर कार क्रमांकासह तशी नोंदही झाली आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱयाचा मुलगा पोलीस अधिकारी कसा झाला? टोलगेट पार करताना पोलीस अधिकारी म्हणून त्याने का सांगितले? त्याच्याकडे बनावट ओळखपत्र असणार का? याचाही तपास करण्यात येत आहे. तपास अधिकाऱयांना मिळालेल्या माहितीनुसार तब्बल सातवेळा टोलगेटवर पोलीस म्हणून त्याची कार सोडून देण्यात आली आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती व सीसीटीव्हीचे फुटेज सीआयडीला मिळाले असून पोलीस दलाच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱया या दलालावर अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एक दोन दिवसांत पुन्हा सीआयडीचे अधिकारी चौकशीसाठी बेळगावकडे येण्याची शक्मयता आहे.