सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज बुधवारी 126 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 76 पुरुष, 50 स्त्रियांचा समावेश आहे. आज 3 तर आतापर्यंत 972 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 528 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 710 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2618 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2492 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 126 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 972 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 846 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1147
मंगळवेढा- 1463
बार्शी – 5886
माढा- 3365
माळशिरस – 5724
मोहोळ- 1629
उत्तर सोलापूर – 742
करमाळा- 2066
सांगोला – 2525
पंढरपूर 6522
दक्षिण सोलापूर – 1459
एकूण – 32,528
होम क्वांरटाईन – 22322
एकूण तपासणी व्यक्ती- 273661
प्राप्त अहवाल- 273619
प्रलंबित अहवाल- 42
एकूण निगेटिव्ह – 241092
कोरोनाबाधितांची संख्या- 32,528
रुग्णालयात दाखल – 1710
आतापर्यंत बरे – 29, 846
मृत – 972