प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 111 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 73 पुरुष, 38 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 833 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 34 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 565रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1043 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 932 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 111 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 833 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 24 हजार 636 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1059
मंगळवेढा- 1337
बार्शी – 5215
माढा- 2956
माळशिरस – 5017
मोहोळ- 1303
उत्तर सोलापूर – 715
करमाळा- 1999
सांगोला – 2312
पंढरपूर 5736
दक्षिण सोलापूर – 1385
एकूण – 29, 034
———/–
होम क्वांरटाईन – 4003
एकूण तपासणी व्यक्ती- 222279
प्राप्त अहवाल- 222237
प्रलंबित अहवाल- 42
एकूण निगेटिव्ह – 193204
कोरोनाबाधितांची संख्या- 29,034
रुग्णालयात दाखल – 3565
आतापर्यंत बरे – 24,636
मृत – 833