ब्लॅक मेल करून मागितली होती खंडणी
प्रतिनिधी / परंडा
सराफ दुकानदार सुरेश बागडे यांना ५० हजार रूपये दे अन्यथा तुला सोने चोरी प्रकरणाच्या खोट्या गुन्हयामध्ये आडकवीन अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या अभिजित हिरालाल पेडगावकर विरुद्ध परंडा पोलिसात दि. २२ मे रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील आरोपी सराफ दुकानदार अभिजीत हिरालाल पेडगावकर (दहिवाळ) हा दि २० मे रोजी रात्री ७ -३० ते ७-४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश बागडे यांच्या घरी गेला व सोने चोरी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली होती याची माहिती तुच दिली होती त्यामुळे माझे खुप नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश च्या केस मध्ये माझे झालेला सर्व खर्च दे मला आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे नाहीतर तुलाही सोने चोरीच्या गुन्ह्यात अडकवील व तुझा गेम करीन तुझ्या घरच्यांनादेखील माहीत पण पडणार नाही अशी धमकी दिली.
महाराष्ट्रातीलच नाही तर बाहेरील राज्यातील मोठ-मोठे गुन्हेगार तसेच पोलिस, मंत्री माझ्या ओळखीचे आहेत. सोन्याच्या धंद्यामधला मी डॉन आहे. तुझा गेम करीन अशी धमकी दिली. दि. २० मे रोजी यातील फिर्यादी सुरेश बागडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी अभिजित पेंडगावकर वर भादवी कलम ३८४, ४५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने हे करीत आहे.