तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत शहारत 47 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 4 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 12 जनांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.
मंगळवारी 180 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 47 पॉझिटीव्ह तर 133 अहवाल निगेटिव्ह आले. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1268 झाली आहे.
आज सापडलेले 47 पॉझिटीव्ह रुग्ण विश्वकर्मा अपार्टमेंट, होटगी रोड, तेलंगी पाच्छापेठ, हनुमान मंदिर जवळ, न्यु पाच्छा पेठ, लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी, अशोक चौक, बेगमपेठ, मारुती मंदिरजवळ घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोमवार पेठ, बारा इमाम चौक, भवानी पेठ, मंत्रीचंडक नगर, शुक्रवार पेठ, शिवसेना कार्यालय सुशिलनगर, विजापूर रोड, दक्षिण कसबा, जुना पोलिस लाईन, मुरारजी पेठ, रेल्वे लाईन, राजेंद्र चौक, रविवार पेठ, मार्कडेय नगर, कुमठा नाका, भारतरत्न इंदिरा नगर, शनिवार पेठ, रविवार पेठ, विठ्ठल पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, बागेवाडीकर हॉस्पिटल, वसंत विहार, कस्तुरबा गांधीनगर, न्यु संजय नगर, कुमटा नाका, भवानी पेठ, ढोर गल्ली, मडीवस्ती, भवानी पेठ, भद्रावती पेठ, माळी नगर , विनायक नगर, अशोक चौक, बोल्ली मंगल कार्यालय जवळ, साईनगर, आदित्य नगर, जुळे सोलापूर आणि बेघर हौसिंग सोसायटी येथे आढळले आहेत.