गुन्ह्यामध्ये नाव गुंतविण्याच्या कारणावरून घटना घडली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, उमानगरी परिसरातील घटना
सोलापूर / प्रतिनिधी
घरफोडीच्या गुन्ह्यात नाव गुंतवण्याची धमकी दिल्यावरून मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमानगरी परिसरात गळा आवळून तसेच शस्त्राने भोसकून सराईत गुन्हेगार बबलू राजेंद्र नरळे ( वय 30, रा. बल्लार चाळ, सोलापूर) याने शैलेश गणपत कोकाटे ( लय 28, बल्लार चाळ सोलापूर) याचा गळा आवळून तसेच गुप्तीने छातीत घुसून खून केल्याची घटना घडली. फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ आरोपीस जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमा नगरी परिसरात आरोपी बबलू नरळे याने मयत शैलेश कोकाटे दुचाकीवरून नेले. उमा नगर परिसरात त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर आरोपी बबलू याने शैलेशच्या डोक्यात दगड आणि हल्ला केला. त्यानंतर त्या दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये आरोपी बबलू याने त्याच्याकडील गुप्ती सारखा शस्त्राने शैलेशच्या छातीवर हल्ला केला. या हल्ल्यात शैलेश जखमी होऊन खाली पडला त्यानंतर आरोपी बबलु याने त्याच्याकडील रुमालाने शैलेशचा गळा आवळून खून केला. दरम्यान पोलिसांनी आरोपी बबलू यास अटक केली असून त्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. यातील मयत शैलेश आणि आरोपी बबलू हे दोघेही सराईत गुन्हेगार होते. त्यांच्या नावावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्ह्यात नाव गुंतवित असल्याने आरोपी बबलू हा शैले वर चिडून होता. यातूनच ही खुनाची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.