चिंचली मायाक्का देवी, जोगुळभावी सत्यम्मा देवीच्याही दर्शनासाठी करावी लागणार प्रतिक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र, कर्नाटक गोव्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा, जोगुळभावी सत्यम्मा आणि चिंचली मायक्का देवीचे दर्शन आणखी एक महिना होणार नाही. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारी यासंबंधी आदेश काढला असून 30 नोव्हेंबरपर्यंत तीनही प्रमुख मंदिरे बंद असणार आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून जिह्यातील तीनही प्रमुख मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. 8 जूनपासून मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारने मार्गसुची जारी केली होती. मात्र कोरोना महामारीच्या वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी ही मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता.
जिल्हाधिकाऱयांच्या या पूर्वीच्या आदेशानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत ही तीनही प्रमुख मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये देवदर्शन सुरू होणार अशी अपेक्षा होती. दसरोत्सवात ही शक्तीपीठे बंद होती. सध्या बेळगावसह कर्नाटकात कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात येत आहे. त्यामुळे मंदिरे खुली होणार अशी अपेक्षा होती.
खबरदारीची उपाय योजना म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत भाविकांसाठी या मंदिरात प्रवेश बंदीचा आदेश कायद ठेवण्यात आला आहे. या काळात दैनंदिन पूजा, अर्चा व धार्मिक विधी सुरूच राहणार आहेत. दसरोत्सवात सौंदत्ती यल्लम्मा व चिंचली मायाक्का देवीचे दर्शन झाले नाही. आता दिवाळीत तरी भाविकांना दर्शनभाग्य मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आणखी एक महिना ही तीनही मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.