नवी दिल्ली
वाहनांचे सुटेपार्ट बनविणारी कंपनी स्टील स्ट्रिप्स व्हील्सला अमेरिकेतील कॅराव्हॅन ट्रेलर बाजारातून 11.25 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या कंत्राटासोबत कंपनीला चालू महिन्यात 21 कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑर्डर मिळाली आहे. स्टील स्ट्रिप्स व्हील्सने याबाबतची माहिती शेअर बाजाराला दिली आहे तर सदरची ऑर्डर कंपनी चेन्नईमधील प्रकल्पातून सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.