जयपूर, गुडगांव, चंदीगढ शहरे अव्वल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामधील वाढत्या स्मार्टफोनमध्ये अव्वल शहरांची हिस्सेदारी वाढलेली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) यांच्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात एकूण 2.10 कोटी युनिट्सचे शिपिंग (जहाजाद्वारे वाहतुक) झाले आहे. जे मागील वर्षांच्या तुलनेत 24 टक्क्यांनी अधिकचे राहिले आहे. विशेष बाब ही आहे, की यामध्ये नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बेंगळूर या शहरांचा वाटा जवळपास 25 टक्क्यांवर राहिला आहे. सदर शहरांमध्ये वर्षाच्या आधारे ऑक्टोबर महिन्याने 50 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
देशात नव्या नावारूपाला येणाऱया बाजारात जयपूर, गुडगांव, चंदीगढ, लखनऊ, भोपाळ आणि कोइमतूर शहरांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील अन्य शहरांचीही वाढ संथ राहिली आहे.
शाओमी-विवो सेलिंग ब्रँडमध्ये अव्वल
देशातील पहिल्या पाच मेट्रो शहरातील ऑनलाईन विक्री ऑक्टोबरमध्ये 57 टक्के राहिली आहे. ज्यामध्ये पुरवठा साखळीत समस्या निर्माण होत गेल्याने ऑफलाईन विक्रीवर मोठा नकारात्मक परिणाम राहिला आहे.