प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीन मध्ये हंदीगनूर ता. बेळगाव येथील एका दहा वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 122 वर पोहचली आहे.
मुंबईहून परतलेल्या 10 वर्षाच्या बालकांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबियांसह मुंबईहून हंदीगनूरला आलेल्यांना गावातच क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.
सोमवारी दुपारच्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार राज्यातील 69 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून राज्यातील बाधितांची संख्या 2, 158 वर पोहचली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी, येळ्ळूर, पिरनवाडी, बेळगुंदी नंतर हंदीगनूर येथील बालकालाही कोरोनाची लागण झाली आहे.