वार्ताहर / हिंडलगा
म. ए. समितीच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर काळय़ा दिनानिमित्त हिंडलगा, मण्णूर, सुळगा (हिं.), आंबेवाडी, गोजगा आदी गावांमध्ये कडकडीत हरताळ पाळण्यात आला. तसेच कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवून संताप व्यक्त करण्यात आला.
म. ए. समितीच्या आदेशानुसार परिसरातील नागरिकांनी आपले दैनंदिन चालणारे सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. रविवारी सकाळपासूनच हिंडलगा परिसरात काळय़ा दिनाचे गांभीर्य दिसून येत होते. त्यानुसार हिंडलगा येथील समिती कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरासमोर जमून निषेध नोंदविण्यात आला.