दिग्दर्शक ए.ए.ल विजय यांचा आगामी चित्रपट
जॅकलीन फर्नांडिस सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. सध्या ती अक्षय कुमारसोबत राम सेतू आणि रणवीर सिंहसोबत सर्कस चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. तर थलाइवीचे दिग्दर्शक ए.एल. विजय यांच्या हॉरर-थ्रिलर चित्रपटात ती दिसून येणार आहे. याचे चित्रिकरण मार्च महिन्यात सुरू होणार आहे.
जॅकलीन हॉरर-थ्रिलर चित्रपटात पहिल्यांदाच काम करणार आहे. परंतु अभिनेत्री या आव्हानात्मक भूमिकेसाठी तयार आहे. चित्रिकरण लंडनमध्ये केले जाणार आहे. जॅकलीन आणि अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नाडियावाला ग्रँडसन प्रॉडक्शनच्या या चित्रपटात क्रीति सेनॉन देखील आहे. याचबरोबर राम सेतू, सर्कस, अटॅक, किक2 यासारखे चित्रपट देखील तिच्याकडे आहेत. तर जॅकलीन हे मिकेले मोरोनासोबत एका म्युझिक व्हिडिओत दिसून येणार आहे. या गाण्याचा टीझर 8 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.