वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम
हॉलंडचा क्रिकेटपटू तसेच डावखुरा फलंदाज बेन कूपरने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 29 वर्षीय कूपरने 70 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॉलंडचे प्रतिनिधीत्व केले होते.
2013 साली कूपरने कॅनडाविरूद्धच्या वनडे सामन्यात आपले पदार्पण केले होते. कूपरने 58 टी-20 सामन्यात 1229 धावा तर 13 वनडे सामन्यात 187 धावा जमविल्या आहेत. कूपरने आपला शेवटचा सामना संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत हॉलंड संघाला सुपर 12 संघात प्रवेश मिळविता आला नव्हता.