प्रतिनिधी / अक्कलकोट
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे व नगरपरिषद यांची संयुक्त कारवाई करण्यात आली. सोमवारी पोलीस निरीक्षक के एस. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहरात पोलीस ठाणे व नगरपरिषद अक्कलकोट यांनी संयुक्तपणे मास्क नसणारे, विना लायसन्स, व ट्रिपल सीट अशा ५३ केसेस करण्यात आल्या.
त्यात मास्क नसणाऱ्या २६ बाकी इतर २७ केसेस करण्यात आल्या. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी ,पोलीस हवालदार विपीन सुरवसे, सुरेश जाधव, अंबादास दूधभाते, प्रमोद शिंपाळे, वाहतूकचे अनिल चव्हाण, सतीश आवले, गोपनीयचे धनराज शिंदे, गजानन शिंदे, नगरपरिषदचे विठ्ठल तेली, एम.एच स्वामी यांनी ही कारवाई केली.यापुढे ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी व मुख्याधिकारी आशा राऊत यांनी केली.
Previous Articleसातारा : जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची आवश्यकता – गृहमंत्री अनिल देशमुख
Next Article ऍमेझॉन इंडियाकडून रोजगार निर्मिती
Related Posts
Add A Comment