प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे.जोर आणखी वाढला आहे.दोन तलाव यापूर्वीच भरले आहेत. काल अणदूर धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे.
गगनबावडा तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे.तालुक्यात आज अखेर एकूण १७५७ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. संततधार पावसामूळे शेताशिवारात पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले भरुन वाहत आहेत.तालुक्यातील कोदे, वेसरफ हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
काल अणदूर हा तिसरा तलाव ओव्हर ठरलो झाला आहे.लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प भरण्याच्या अवस्थेत आहे.तिन्ही धरणे भरल्याने कुंभी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कुंभी नदीतून ३५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे,वेसरफ या धरणांच्या सांडव्यावरुन पाणी सूरु केले आहे. नदीकाठच्या शेतकरी व गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सर्वच धरणांच्या सांडव्यावरुन पाणी कोसळत असल्याने पर्यटकांना भूरळ घालते आहे.
Trending
- मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचा निकाल १०० टक्के
- रेवस-रेडी सागरी महामार्ग शेतकरी-मच्छिमार-सरकार समिती स्थापन होणार
- खा. संजय राऊत यांच्या विरोधात कणकवलीत जोडो मारो आंदोलन
- सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड; 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने जप्त
- भ.ता.चव्हाण.मा.विद्यालय चौकेचा निकाल १००%
- Ajit Pawar : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा- अजित पवार
- देवसू माध्यमिक विद्यालयाची २२ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा
- वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा द्या ; केसरकर यांचं रेल्वे मंत्र्यांकडे साकडं