अटकेतील दोघांची पोलिसांना माहिती, पोलिसांकडून गुह्याचा कसून तपास
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीमधील आंतरराष्ट्रीय कॉल रॅकेटमधील तिसरा संशयित अर्शद नवाझ युक्रेनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान अटकेत असलेल्या संशयितांकडून ही माहिती उघड करण्यात आली आहे. युपेनमध्ये असलेल्या अर्शदबरोबर अटकेतील आरोपींचे नेमके काय संबंध आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.
शहरातील आठवडा बाजार येथील सायबर पॅफेमधून आंतराष्ट्रीय कॉल केले जात असल्याचा प्रकार 12 ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडून रत्नागिरी पोलिसांना सूचित केल्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये सायबर पॅफेचालक अलंकार अरविंद विचारे (38, छत्रपतीनगर रत्नागिरी), फैजलरझा अगिरझा सिद्धीकी (33, नवी मुंबई) यांना अटक केली. तर अर्शद नवाझ अद्याप बेपत्ता आह़े तपासात तो युक्रेनमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे.
रत्नागिरीमधील श्री मोबाईल ऍन्ड टेककॉम शॉप या ठिकाणी बसवण्यात आलेल्या राऊटरमधून सुमारे 8 हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय कॉल केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलीस तपासामध्ये आरोपींनी हे कॉल रत्नागिरीमधील लोक आपल्या मस्कत, कतार, सौदी, कुवेत, ओमान आदी देशातील नातेवाईकांना करत असल्याचे सांगितले. मात्र हे कॉलसेंटर चालवताना अनेक संशयास्पद बाबी समोर आल्य़ा
अटक केलेला दुसरा संशयित आरोपी फैजलरझा सिद्धीकी याने बांद्रा मुंबई येथे आपले ऑफिस असल्याचे सांगितले. रत्नागिरी पोलिसांनी या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी पॅपिटल ओशियन इन्व्हेस्टमेंट ऍन्ड फायनान्शियल सोलुशन्स नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस असल्याचे समोर आले. सिद्धीकी याच्या पनवेल येथील घरी पोलीस गेले असता तेथे त्याचे आई-वडील, बहीण राहतात. सिद्धीकी घरगुती वादामुळे वेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे समोर आले. यामुळे संशयित आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी खोटी माहिती पुरवत आहेत. दरम्यान 8 हजार आंतराष्ट्रीय कॉलचे सीडीआर काढण्याचे काम पोलिसांकडून सुरु आह़े