वृत्तसंस्था/ अमरावती
विशाखापट्टणम जिल्हय़ात बुधवारी पहाटे आंध्रप्रदेश पोलिसांनी एलीट ग्रेहाउंड्सच्या मदतीने एका चकमकीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांचा एक म्होरक्या आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे.
माम्पा पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोडणाऱया तीलगमिट्टा जंगलात भाकप (माओवादी) आणि राज्याचे नक्षलवादविरोधी दल ग्रेहाउंड्स यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत 6 मृतदेह हस्तगत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चकमक स्थळावरून एके-47, एक एसएलआर, कार्बाइन, तीन .303 रायफल आणि एक बंदुक ताब्यात घेण्यात आली आहे. परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचे म्हटले गेले.
यापूर्वी 11 जून रोजी ओडिशाच्या बारगढ जिल्हय़ातील चकमकीत भाकप (माओवादी)चा एक सदस्य मारला गेला होता. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणावरून एके-47 रायफल आणि अन्य सामग्री हस्तगत केली होती. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्याचे नाव रविंद होते. छत्तीसगड सरकारने त्याच्यावर 7 लाख रुपयांचे तर ओडिशा सरकारने 5 लाख रुपयांचे इनाम घोषित केले होते. रविंद्रच्या विरोधात दोन्ही राज्यांमध्ये हत्येसह अनेक गुन्हे नेंद होते.