प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य घरातील रूग्णांसाठी ११०० बेडच्या कोरोना केअर सेंटरची उभारणी करून राज्यभरात कौतुकाचा विषय ठरलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांना येथील शिवाजंनी फौंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी २६ जून रोजी आमदार लंके यांना `जाणता आमदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष अजित पवार, सचिव सरिता पवार यांनी दिली.आमदार लंके यांच्याशी संपर्क साधून त्यांना फौंडेशनचे सामाजिक कार्य आणि पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यांनी होकार दिल्यानंतर पुरस्काराची घोषणा केली. आमदार लंके यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.