क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन कराटे गोशिनरू, मलेशिया या संस्थेच्या वतीने राज्य संघटनेची बेंगळूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत 5 जिल्हय़ांचे कराटे मास्टर्स हजर होते. यावेळी ज्येष्ट व वरिष्ट कराटेमास्टर बेळगावच्या मधू पाटील यांची संघटनेच्या सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
बेंगळूर येथील बैठकीला ग्रँण्डमास्टर नरसिंहन, श्रीनिवासन गणेश, अतिऊल्ला, के. रवी, के. वासण्णा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या संघटनेच्या चेअरमनपदी ग्रॅण्डमास्टर नरसिंहन, श्रीनिवासन गणेश, अतिऊल्ला, के. रवी, के. वासण्णा यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. मधू पाटील हे बेळगावात इंडियन कराटे गोशिनरू (मलेशिया) या संस्थेशी गेली 46 वर्षे निगडित आहेत.