तहसीलदार कार्यालयात मोठी गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतीची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 22 रोजी तर दुसऱया टप्प्यात 27 रोजी मतदान होणार आहे. 7 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमाव करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे इच्छुकांनी धावपळ सुरू केली आहे.
जुन्या तहसीलदार कार्यालय परिसरात शनिवारी कागदपत्रांसाठी एकच गर्दी झाली होती. कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र (ऍफिडेव्हिट), 20 रुपयांचे दोन बॉन्ड यासह झेरॉक्स कॉपी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. बॉन्ड लिहिणाऱयांकडे मोठी गर्दी झाली होती. जातीचे प्रमाणपत्र देताना प्रतिज्ञापत्रही द्यावी लागते. त्यामुळे शनिवारीच अशा इच्छुकांनी गर्दी केली होती.
सर्वसामान्य उमेदवाराला 200 रुपये अनामत आहे तर आर्थिक मागासांना केवळ 100 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतसाठी अर्ज मोठय़ा संख्येने येण्याची शक्मयता आहे. मतदार याद्यांबरोबरच मतदान कार्ड यासाठीही उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालय गजबजू लागले आहे.
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
: प्रपत्र पाचमध्ये उमेदवारी अर्ज
: जात प्रमाणपत्र
: प्रतिज्ञापत्र (ऍफिडेव्हिट) 20 रुपये किमतीच्या दोन प्रती (झेरॉक्स प्रत)
: मतपत्रिकेत नमूद करावयाच्या नावाबाबत लिखित तपशील
: उमेदवाराने निवडणूक अधिकाऱयांना सादर करावी लागणारी अधिक माहिती (प्रोफाईल)
: ग्राम पंचायतचे थकबाकीसंदर्भात विनाहरकत प्रमाणपत्र
: मतदान ओळखपत्र
: आधारकार्डची झेरॉक्स प्रत
: पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे