मास्टर्स मि. कर्नाटक बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर; उत्कृष्ट पोझरचा बहुमान मारूती देवाडिगाला

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
उडपी येथे कर्नाटक राज्य शरिरसौष्टव संघटना व उडपी जिल्हा शरिरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मि. कर्नाटका राज्यस्तरिय शरिरसौष्टव स्पर्धेत उडपीच्या नित्यानंद कोटीयन याने आपल्या पिळदार शरिराच्या जोरावर ‘मि. कर्नाटका’ हा मानाचा किताब व आदित्य शेट्टीने पहिले उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर उत्कृष्ट पोझरचा किताब भटकळच्या मारूती देवाडिगा याने तर मि. कर्नाटका मास्टर्स किताबाचा मानकरी बेळगावचा प्रतापा कालकुंद्रीकर यांने पटकाविला. महिलांमध्ये बेंगळूरच्या सार्वन, उडपीच्या गोवर्धन बंगेरा व स्नेहा प्रभानर यानी विजेतेपद पटकाविले.
सविस्तर निकाल : 55 किलो-1) आकाश आर. शिमोगा, 2) आकाश निंगरानी बेळगाव, 3) कृष्णप्रसाद उडुपी. 60 किलो गट -1) धिरजकुमार उडुपी, 2) अभिलाश उडुपी, 3) अक्षय रावळ बेळगाव. 65 किलो गट -1) शैलेशकुमार बंगळूर, 2) शरद उडुपी, 3) श्रीनिवास तुमकूर. 70 किलो गट -1) रिहानकुमार नाईक चिक्कमंगळूर, 2) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 3) निरंजन दक्षिण कन्नडा.
75 किलो गट -1) आफरोज ताशिलदार बेळगाव, 2) रवीकुमार एस. बेंगळूर, 3) सर्वन बेंगळूर. 80 किलो-1) आदर्श भट्ट उडुपी, 2) सलमान दक्षिण कन्नडा, 3) विशाल चव्हाण बेळगाव. 85 किलो -1) नित्यानंद कोटियन उडुपी, 2) पवनकुमार मंगळूर, 3) संतोष नाईक धारवाड. 85 किलोवरील -1) चरणराज उडुपी, 2) सुरेशकुमार बी. के. दावणगेरी, 3) महंमद राहिल शिमोगा.
मास्टर्स गट-1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) कृष्णप्रसाद उडुपी, 3) अमित करकडा मंगळूर. यांनी विजेतेपद पटकाविले. 50 वर्षावरील गटात शार्वन बेंगळूर 2) सेहबीड एम. जी. बिजापूर, 3) प्रवीण देवाडिगा उडुपी, 60 वर्षावरील 1) गोवर्धन बंगेरा उडुपी, 2) रवीकुमार मंगळूर, 3) सदानंद बडवाण्णाचे बेळगाव. वूमन्स स्पोर्ट्स फिजिक्स -1) स्नेहा प्रभाकरन 2) शारदा नाईक मंगळूर. मेन्स फिजिक्स -1) मनिश मंगळूर, 2) हितेश अमानी उडुपी, 3) निश्चय शेट्टी मंगळूर. दिव्यांग गट -1) पवनगौडा मंडय़ा, 2) जगदीश पुजारी मंगळूर, 3) सतीन के. मंगळूर.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., जे.डी. भट्ट, जे. निळकंठ, रघुकुमार, दिलिपकुमार तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत व उमा महेश यांनी काम पाहिले.