ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊ विश्वविद्यालयाद्वारे आयोजित केली जाणारी संयुक्त बीएड प्रवेश परीक्षा 2020 उत्तर प्रदेशातील 50 जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदा परीक्षेसाठी 74 जिल्ह्यात केंद्रे बनवण्यात येणार होती. मात्र आतापर्यंत झालेल्या तयारी नुसार आता 29 जुलैला 50 जिल्ह्यात बनवण्यात आलेल्या केंद्रात बीएड परीक्षा घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षांचे निकाल 28 ऑगस्टला घोषित केले जाणार आहे. 14 सप्टेंबरपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू केली जाणार असून 17 ऑक्टोबर पर्यंत चालेल. सत्र 19 ऑक्टोबर पासून चालू होईल तर नियमित प्रवेश 26 ऑक्टोबरपासून सुरू होतील.
तर प्रवेश परीक्षेच्या काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त काळजी घेतली जाणार आहे. या अंतर्गत निर्जंतुकीकरणासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे. जी फक्त निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या व्यवस्थेवर देखरेख ठेवेल. परिक्षेच्या एक दिवस आधी केंद्र, वर्ग आदीचे निर्जंतुकीकरण, गेटवर थर्मल स्क्रीनिंग आणि मास्क आदींची व्यवस्था पाहतील. जर एखाद्या विद्यार्थ्याने मास्क आणला नसेल तर त्याला मास्क ही दिला जाणार आहे.
बीएड प्रवेश परीक्षेचे समन्वयक प्रो. अमिता बाजपेयी यांनी सांगितले की, आम्ही अशा जिल्ह्यांना केंद्र नाही बनवले जिथे आम्ही तीन पेक्षा कमी केंद्र बनवण्याच्या स्थितीत होतो. त्यामुळे 50 जिल्ह्यांमध्येच केंद्र बनवण्यात आली आहेत. एका केंद्रात तीनशे विद्यार्थी असतील. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.