प्रतिनिधी /बेळगाव

साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचे नूतन अध्यक्ष म्हणून सेवंतीलाल शहा तर उपाध्यक्ष म्हणून विनायक आजगावकर व सुधीर शानभाग यांची निवड झाली आहे.
मंगळवारी दुपारी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली. याच सभेत सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारी मंडळातील अन्य सदस्य पुढीलप्रमाणे- एस. वाय. प्रभू, आर. बी. देशपांडे, पंकज शिवलकर, एस. ए. वालावलकर, डी. बी. कलघटगी, बिंबा नाडकर्णी, लता कित्तूर, डॉ. धनश्री एच. आजगावकर, अजित सोलापूरकर, अजय आजगावकर, अशोक शानभाग, भरत शानभाग, मधुकर सामंत, संदीप तेंडोलकर, डॉ. ललिता प्रभू, नित्यानंद करमळी, माधुरी शानभाग, दिलीप चिटणीस, डी. बी. देशपांडे, आनंद सराफ, विजया पै, संजय बिच्चू, संदीप शानभाग यांची निवड झाली आहे. या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून सर्व पदाधिकाऱयांचे अभिनंदन होत आहे.